द कॉल ऑफ लाइफ
नट हॅमसन
२७ ऑगस्ट २०२१
कोपनहेगनच्या बंदराच्या आतील बाजूस असलेल्या मैदानाजवळ व्हेस्टरव्होल्ड नावाचा तुलनेने नवा असलेला रस्ता होता. मात्र तो तसा एकाकी होता. त्या रस्त्यावर थोडीच घरे होती व थोडेच गॅसचे दिवे होते. रस्त्यावर कोणीच माणसे सहसा दिसत नसत. सध्या अगदी उन्हाळ्यातही त्या रस्त्यावर रहदारी तुरळकच होती. काल संध्याकाळी एक आश्चर्यकारक गोष्ट त्या रस्त्यावर घडली. मी रस्त्याच्या बाजूने इकडे तिकडे फेऱ्या मारीत असताना व…